ST कर्मचारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 24, 2023 | 1:48 PM

एसटी कर्मचारी बँकेचे १९ पैकी १४ संचालक कालपासून नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत फक्त ५ संचालक हजर होते. एसटी कर्मचारी बँकेचे १४ संचालक हे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : ST कर्मचारी बँकेत वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. एसटी कर्मचारी बँकेचे १९ पैकी १४ संचालक कालपासून नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत फक्त ५ संचालक हजर होते. एसटी कर्मचारी बँकेचे १४ संचालक हे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तर येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचारी बँकेचे संचालक भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी बँकेत एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र आता त्याच एसटी कर्मचारी बँकेतून गुणरत्न सदावर्ते यांना धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. बघा नेमकं काय घडलं?

Published on: Nov 24, 2023 01:48 PM
पुन्हा नवी धमकी, मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोट… ४८ तासांत १० लाख डॉलर, काय आला मेल?
मकाऊ की रातें… संजय राऊत यांच्याकडून पुन्हा इशारा, आणखी एक Video टि्वट