मेहुण्यावरचं प्रेम, एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचा गेम? काय आहे प्रकरण?
मी कष्टकऱ्यांचा आवाज आहे, असे म्हणत डंके की चोटपर एसटी विलनीकरणाचा वायदा देणारे सदावर्ते आता अडचणीत आलेत. आपण कष्टकऱ्यांचा आवाज असल्याचा दावा सदावर्ते करतात मात्र त्यांच्यावरच करण्यात आलेत आरोप
मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही महिन्यांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेनं एसटी कर्मचारी बँकेत सत्ता मिळवली. मात्र मेहण्यावरचं अती प्रेम आणि मनमानी कारभाराच्या आरोपात १९ पैकी १४ संचालक नॉट रिचेबल झालेत हे संचालक काही दिवसात आपली भूमिका मांडणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर गुणरत्न सदावर्ते यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मी कष्टकऱ्यांचा आवाज आहे, असे म्हणत डंके की चोटपर एसटी विलनीकरणाचा वायदा देणारे सदावर्ते आता अडचणीत आलेत. आपण कष्टकऱ्यांचा आवाज असल्याचा दावा सदावर्ते करतात मात्र करण्यात आलेल्या आरोपांनुसार मेहुण्यावरचं प्रेम त्यांच्या एसटी बँकेवरच्या सत्तेला सुरूंग लावू शकतं. काय काय आरोप करण्यात आले गुणरत्न सदावर्ते यांच्यावर… बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट