MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांचं उद्यापासून आंदोलन, सदावर्ते यांची तयारी सुरू, कर्मचाऱ्यांशी चर्चा करतानाचा ऑडिओ व्हायरल
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे. सातव्या वेतनाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारणार, गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी उद्यापासून आंदोलन करणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळी प्रवाशांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी उद्यापासून आंदोलन करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्यापासून सुरू करण्यात येणाऱ्या या आंदोलनासाठी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, विविध जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्यासोबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लिप गुणरत्न सदावर्ते यांच्यी व्हायरल होत आहे. या ऑडिमध्ये लॉगबुकचा फोटो का काढत नाही, अशी विचारणा एसटी कर्मचाऱ्यांना गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात येत असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हे आंदोलन किती दिवस असेल याचा काहीचअंदाज त्यांच्याकडून देण्यात आला नाही. मात्र ऐन दिवाळी प्रवाशांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे.