पक्ष अन् चिन्ह मिळावं म्हणून साकडं घातलं होतं, आता नवस फेडायला अयोध्येला चाललोय

“पक्ष अन् चिन्ह मिळावं म्हणून साकडं घातलं होतं, आता नवस फेडायला अयोध्येला चाललोय”

| Updated on: Mar 25, 2023 | 3:41 PM

CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते कशासाठी जाणार आहेत? याबाबत शिवसेनेच्या नेत्यानं सांगितलं आहे. पाहा...

मुंबई : शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलंय. पाच एप्रिलला आमचा अयोध्या दौरा ठरलेला आहे. एक दिवसाचा हा दौरा असेल. आम्ही साकडं घातलं होतं की आम्हाला धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह मिळावं. ते मिळालं की आम्ही सगळे दर्शनासाठी येणार. पक्ष अन् चिन्ह आम्हाला मिळालं आहे. आमचा नवस पूर्ण झाला आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आयोध्याला चाललोय, असं भरत गोगावले यांनी सांगितलं. ते अधिवेशनादरम्यान टीव्ही 9 मराठीशी मुंबईत बोलत होते.

Published on: Mar 25, 2023 03:41 PM