मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मोठ्या संख्येने उतरले रस्त्यावर, मागणी काय?
विलेपार्लेतील नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी भागात जुने जैन मंदिर होते. हे मंदिर पाडण्यापूर्वी पालिकेने नोटीस दिली होती. यानंतर जैन समाजाने न्यायालयात धाव घेतली. मात्र कनिष्ठ न्यायालयाने जैन समाजाची याचिका फेटाळली. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं पण निर्णय येण्यापूर्वीच पालिकेने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून हातोडा फिरवत ते जमीनदोस्त करण्यात आले होते. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या या कारवाईनंतर मुंबईत जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेने जैन मंदिरावर केलेल्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली असून यामध्ये मोठ्या संख्येने जैन समुदायातील महिला आणि पुरूषांचा सहभाद दिसत आहे. ‘मंदिर तुटा, हौसला नाही,’ असे बोर्ड हाती घेऊन शनिवारी सकाळी ९ वाजेपासून जैन समाजाकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी पालिकेकडून कारवाई करण्यात आली त्याच जागेवर पुन्हा पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर उभारावे अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय

जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब

मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
