एकनाथ शिंदे यांनी बोलावली खासदारांची तातडीची बैठक; 'या' मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

एकनाथ शिंदे यांनी बोलावली खासदारांची तातडीची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

| Updated on: Mar 12, 2023 | 9:51 AM

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून बैठकीतील विषय मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्यवरचना आखली जाणार असल्याची माहिती आहे. तसंच मतदार संघातील प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याच बरोबर सुप्रीम कोर्टातील निकाल आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आणलेल्या हक्कभंग राज्यसभेत त्यावर हरकतीबाबतही चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 12, 2023 09:51 AM