गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावलं; एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली
Girish Bapat Passed Away : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार आदरणीय गिरीश बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं, अशी भावना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या त्यांनी अखेरचा श्वास वर्षी घेतलाय. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.