परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्याचं नेमकं कारण काय?; अनिल देशमुख म्हणाले, यामुळेच हे बक्षीस…
सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. तसेच तब्बल वर्षभर पेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं होतं. राज्य सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडीला धक्का देणारा मानला जातोय.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. तसेच तब्बल वर्षभर पेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं होतं. राज्य सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडीला धक्का देणारा मानला जातोय. त्यानंतर राष्ट्रवादीसह मविआच्या नेत्यांनी यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर निलंबन मागे घेण्याच्या निर्णयावर अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्याला फसवण्यासाठीच परमवीर सिंह यांचा वापर करण्यात आला असा आरोप केला आहे. तसेच परमवीर सिंह याचा वापर करण्यात आला आणि त्या बदल्यात आता त्यांना हे बक्षीस मिळालं आहे. आम्ही केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. याच्याबाबतीत आपण सविस्तर आज कोअर कमिटीच्या मिटिंगमध्ये बोलणार आहे. यानंतर आपण त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन बोलू असेही देशमुख यांनी म्हटलेलं आहे.