Mumbai Railway Megablock | मुंबईकरांनो… आज रेल्वेनं प्रवास करताय? बघा कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो आज कुठं बाहेर जाण्याचं तुमचं नियोजन असेल आणि तुम्ही प्लान करत असाल त्यातही तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा. मुंबईच्या आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. लोकल रेल्वे मार्गाचे रुळ दुरुस्त करणे, सिग्नल यंत्रणा आणि तांत्रिक कामासाठी तिन्ही मार्गांवर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : मुंबईकरांनो आज कुठं बाहेर जाण्याचं तुमचं नियोजन असेल आणि तुम्ही प्लान करत असाल त्यातही तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा. कारण आज भारतीय रेल्वे मर्गिकेच्या तिनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. मुंबईच्या आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. लोकल रेल्वे मार्गाचे रुळ दुरुस्त करणे, सिग्नल यंत्रणा आणि तांत्रिक कामासाठी तिन्ही मार्गांवर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन अशा धिम्या मार्गावर सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ पर्यंत ब्लॉग घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गांवर ठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. यासोबतच पश्चिम रेल्वे मार्गांवर अंधेरी ते बोरीवली अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.