आता मुंबईतच सिंगापूर… निसर्गाच्या सान्निध्यात भटकंतीचा पहिलाच ‘उन्नत मार्ग’ आजपासून खुला
मुंबईतील मलबार हिल परिसरात मुंबई महापालिकेकडून नेचर वॉक वे... मुंबईकरांसाठी खुलं करण्यात आलं आहे. या निर्सग उन्नत मार्गावरून जेव्हा मुंबईकर चालतील तेव्हा त्यांना निसर्गाच्या काही काळ सानिध्यात घालवता येतील.
मुंबई म्हटलं की धकाधकीचे आणि धावपळीचे जीवन असंच डोळ्यासमोर येतं. अशातच याच मुंबईकरांना नेहमी प्रदूषणाचा सामना करावा लागतो. मुंबईकरांना सातत्याने प्रदूषणाचा सामना करावा लागतो. मुंबई शहर मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे पाहायला मिळते. मात्र याच मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना काहीसा विरंगुळा मिळावा, काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात शांत घालवता यावे याकरता मुंबई महापालिकेकडून मुंबईत सिंगापूर फॉरेस्ट थीमवर एक निसर्ग उन्नत मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबईतील मलबार हिल परिसरात असणाऱ्या निसर्ग उन्नत मार्ग पर्यटकांसाठी खुला झाला आहे. गेल्या अडीच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर निसर्ग उन्नत मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. दररोज पहाटे पाच वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत निसर्ग उन्नत मार्ग पर्यटकांसाठी खुला असणार आहे. गर्दी टाळण्यासाठी एकाच वेळेला फक्त २०० पर्यटकांना निसर्ग उन्नत मार्ग येथे प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, पर्यटकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट विक्री आणि नोंदणीची सुरूवात करण्यात आली आहे.