Mumbai Metro Shed | मुंबईतील कांजूरच्या मेट्रो कारशेडच्या जागेचा तिढा कायम
मुंबईतील कांजूर येथील मेट्रो कारशेडचा तीढा अद्याप कायम आहे.
मुंबई : महत्वाची मुंबईतून मुंबईतील कांजुरच्या मेट्रो कारशेडच्या जागेचा तीढा कायम. कांजूर मधील 686 हेक्टर जागा राज्याची तर 92 हेक्टर केंद्राची जागा आहे. मेट्रो कारशेड कांजूरमध्ये करण्यात यावं, यासाठी सरकार आग्रही आहे. पण यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद हायकोर्टात प्रलंबित आहे. यावर सोमवारी हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून युक्तिवाद करण्यात आला. मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूर मार्गच्या संपूर्ण जागेवर आपलाच मालकी हक्क असल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. तो राज्य सरकारने खोडून काढलाय. कांजूरच्या भूखंडावर केवळ केंद्राचाच नव्हे, तर राज्याचाही अधिकार असल्याचा युक्तिवाद हायकोर्टात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आला.
Published on: Jun 14, 2022 01:32 PM
Latest Videos