Mumbai Metro Trial Run: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोला दाखविला हिरवा झेंडी
सारीपुत नगर ते मरोळ नाक अशी ट्रायल रन घेण्यात येणार आहे. भुयारी मार्गातून प्रवास करणारी ही पहिली मेट्रो असेल. 2023 पर्यंत ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत हजर असेल. या मेट्रोच्या आणखी काही चाचण्या बाकी आहेत.
बहुचर्चित मुंबई मेट्रो तीनचे ट्रायल रन आज पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मेट्रोला हिरवा झेंडा दाखविला. तत्पूर्वी दोघांनीही मेट्रोच्या कोचचा आढावा घेतला. त्यानंतर ते बाहेर आले. मेट्रो तीनची ही पहिली चाचणी आहे. भुयारी मार्गातून ही मेट्रो जाणार आहे. अद्याप या मेट्रोची सेफ्टी टेस्ट झाली नसल्याने त्यात कुणालाही प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सारीपुत नगर ते मरोळ नाक अशी ट्रायल रन घेण्यात येणार आहे. भुयारी मार्गातून प्रवास करणारी ही पहिली मेट्रो असेल. 2023 पर्यंत ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत हजर असेल. या मेट्रोच्या आणखी काही चाचण्या बाकी आहेत.
Published on: Aug 30, 2022 12:33 PM
Latest Videos