Anil Parab : ‘निरिक्षण आणि जजमेट यामध्ये फरक’ आहे अनिल परब यांची प्रतिक्रिया
राणा दाम्पत्याविरोधातील राजद्रोहाच्या कलमाविषयी बोलताना अनिल परब म्हणाले, ‘सत्र न्यायालयाने निरिक्षण नोंदवले आहे. न्यायालय नेहमी वेगवेगळी निरिक्षण नोंदवत असते. जजमेंटमध्ये अटी घातल्या आहेत. कोर्टाने कशा परिस्थितीत निरिक्षण नोंदवले आहे, याचा राज्य सरकार अभ्यास करेल.
मुंबईः नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले. मात्र कोर्टाचं हे केवळ निरीक्षण असून ते जजमेंट नाही.हा खटला चालेल त्यावेळी राज्य सरकार यासंदर्भातील पुरावे देईल, असा दावा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी कोर्टाने राजद्रोहाविषयचीचं निरीक्षण नोंदवलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र शिवसेना आणि राज्य सरकारतर्फे ऐनवेळी याविषयीचे पुरावे दिले जातील, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
Published on: May 06, 2022 07:55 PM
Latest Videos