Mumbai Weather Alert : मुंबईकरांनो… ‘ते’ 18 दिवस चिंतेचे… हवामान खात्याकडून मोठी माहिती समोर
मुंबईत पावसाने जोर धरला की मुंबईकर नागरिकांची मोठी तारांबळ उडते. अशातच समुद्राला मोठी भरती असेल तर मुंबई तुंबण्याचीही शक्यता असते. अशातच यंदा १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १८ दिवस हे मोठ्या भरतीचे असणार आहेत.
वाढत्या तापमानामुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर घराबाहेर पडणं टाळताना दिसताय. अशातच वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांना त्वचेचे विकार उद्भवताना दिसताय. गेल्या महिन्याभरात मुंबईत त्वचेच्या विकाराचे ३५ टक्के रुग्ण वाढले आहेत. घाम येण्यामुळे जीवनुजन्य, बुरशीजन्य विकाराने मुंबईकर हैराण झालेत. तर मुंबईत आणखी २-३ अंशांनी तापमान वढणार असल्याचा अंदाज वर्तविला जातोय. कडाक्या तापमानादरम्यान मुंबईतील पावसासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान हे १८ दिवस भरतीचे असणार आहेत. जून आणि जुलैमध्ये सर्वाधिक मोठी भरती येणार आहे असून या चार महिन्यात १८ मोठ्या भरतीत जास्त उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे.

भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम

तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?

जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात

त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
