श्रीसेवकांच्या भेटीसाठी राज ठाकरे एमजीएम रूग्णालयात; पाहा व्हीडिओ...

श्रीसेवकांच्या भेटीसाठी राज ठाकरे एमजीएम रूग्णालयात; पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 17, 2023 | 1:29 PM

MNS Raj Thackeray at MGM Hospital : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसेवकांचा मृत्यू; श्रीसेवकांच्या भेटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमजीएम रूग्णालयात दाखल...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमजीएम रूग्णालयात जात श्रीसेवकांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या 12 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. या घटनेनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांनी काहीवेळा आधी फेसबुक पोस्ट लिहित श्रीसेवकांना आदरांजली अर्पण केली. तसंच रूग्णालयात जात त्यांनी विचारपूसही केलीय. या श्रीसेवकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भेट घेतली. श्रीसेवकांच्या भेटीसाठी आज राज ठाकरे पोहोचले आहेत.

Published on: Apr 17, 2023 01:25 PM