किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु…
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. किरीट सोमय्या यांनी या व्हिडीओची सत्यता तपसण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. विधानसभेत कथित व्हिडीओचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्याशिवाय राज्य महिला आयोगानं देखील मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Published on: Jul 19, 2023 11:36 AM
Latest Videos