Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणीच पाणी, रास्ता वाहतुकीसाठी बंद

| Updated on: Sep 13, 2022 | 9:15 AM

येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यासोबतच मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातही मुसळधार पाऊस पडतोय.

मुंबईमध्ये मुसळधार पावसाळा सुरवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरवात झालेली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमधे पाणी साचायला सुरवात झाली आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अंधेरीच्या साकीनाका परिसरातसुद्धा पाणी साचायला सुरवात झालेली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होतोय. येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यासोबतच मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातही मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आलेला असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

 

 

Published on: Sep 13, 2022 09:15 AM