Mumbai Rain | मुंबईची तुंबई, सखल भागात पाणी, रेल्वे वाहतूक ठप्प
मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक ही बंद झाली आहे.
मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, धारावी, अंधेरी, कांदिवली, मिरारोड यांसह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या सखल भागात पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक ही बंद झाली आहे.