Breaking News: मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला धमकीचा मेजेस आल्यानं खळबळ, पोलीस अलर्ट मोडवर! आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन मेसेज, सूत्रांची माहिती

Breaking News: मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला धमकीचा मेजेस आल्यानं खळबळ, पोलीस अलर्ट मोडवर! आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन मेसेज, सूत्रांची माहिती

| Updated on: Aug 20, 2022 | 8:51 AM

Mumbai Traffic Control Room : आता मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्याने पुन्हा एकदा पोलिसांनी मुंबईत बंदोबस्त वाढवला असून खबरदारी घेतली जातेय. आगामी सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जातेय.  

मुंबई : मुंबई ट्रफीक कंट्रोलला (Mumbai Traffic Control) धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 26 /11 सारखा हल्ला (Mumbai 26/11 Attacked) करणार असा धमकीचा मेसेज देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भारता बाहेरील क्रंमाकावरून धमकी देणारा मेसेज आल्याचं समजतंय. या प्रकारामुळे आता मुंबईतील पोलीस (Mumbai Police News) यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपासही केला जातोय. विशेष म्हणजे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट काही दिवसांपूर्वीच हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ आढळून आली होती. त्यानंतर ही बोट चुकून आपला मार्ग भरकटल्यामुळे हरिहरेश्वर या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आल्याची माहिती समोर आलेली. मात्र या प्रकारानंतर रायगड जिल्ह्यासह एकूण रायगड आणि आसपासच्या जिल्ह्यांतील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. आता मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्याने पुन्हा एकदा पोलिसांनी मुंबईत बंदोबस्त वाढवला असून खबरदारी घेतली जातेय. आगामी सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जातेय.

Published on: Aug 20, 2022 08:51 AM