मुंबईकरांसाठी अवकाळी पावसाची मोठी बातमी, हवमान विभागाने काय वर्तवली शक्यता?

मुंबईकरांसाठी अवकाळी पावसाची मोठी बातमी, हवमान विभागाने काय वर्तवली शक्यता?

| Updated on: Apr 26, 2023 | 8:40 AM

VIDEO | मुंबई आणि आसपासच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता, हवमान विभागाने नेमका काय वर्तवला अंदाज?

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळीनं पुन्हा हजेरी लावण्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पुन्हा तो हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईकरांसाठी अवकाळी पावसाची मोठी बातमी हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात उद्या गुरूवारी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याने मुंबईसह मुंबईतील काही परिसरात उद्या अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील पिकांवर या अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मुंबईसह कोकणात वादळीवाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या अलर्टसह अवकाळी पावसाचा इशाराही दिला आहे.