चर्चगेटमधील मुलींच्या हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात नवा खुलासा, तपासातून काय उघड?
VIDEO | चर्चगेटमधील मुलींच्या हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात पोलीस तपासातून मोठी माहिती आली समोर
मुंबई : चर्चगेट महिला वसतिगृह येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणात नवे खुलासे आता समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून जलद गतीने तपास सुरु आहे. चर्चगेटमधील मुलींच्या हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपीकडून हत्या करण्यात आली आहे. आरोपीनं तरूणीवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केल्याचे तपासातून उघड होत आहे. दरम्यान, पोलिसांनी हॉस्टेलमधील सात ते आठ जणांचे जबाब नोंदवल्याचेही सांगितले जात आहे. तर पीडितेचे व्हॉट्सअप संभाषणही पोलिसांनी तपासल्याचे माहिती समोर आली आहे. यासोबत पीडिता राहत होती त्या चौथ्या मजल्यावर सीसीटीव्ही आहे. मात्र तो कार्यान्वित नव्हता, अशीदेखील माहिती समोर आलीय. वसतिगृहातील कित्येक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
Published on: Jun 09, 2023 10:12 AM