'मविआ'च्या वज्रमूठ सभेचं मैदान पवित्र, कुणी गोमूत्र शिंपडून केलं शुद्धीकरण

‘मविआ’च्या वज्रमूठ सभेचं मैदान पवित्र, कुणी गोमूत्र शिंपडून केलं शुद्धीकरण

| Updated on: Apr 17, 2023 | 1:51 PM

VIDEO | नागपुरात झालेल्या महाविकास आघाडीच्या सभास्थळाचं गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, कुणी केलं सभास्थळ पवित्र?

नागपूर : नागपूर येथील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची संभाजीनगर नंतर दुसरी संयुक्त वज्रमूठ सभा झाली. यासेभेला राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीने जोरदार सभा घेत राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. संभाजीनगरच्या सभेनंतर नागपुरात पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना जोरदार टीका केली. दरम्यान, नागपूरात वज्रमूठ सभा झालेल्या मैदानात स्थानिक नागरिकांकडून शुद्धीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून मैदानात नागरिकांकडून हे शुद्धीकरण करून मैदानाची स्वच्छता करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. तर यावेळी स्थानिक नागरिकांनी महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी देखील केली. स्थानिक नागरिकांनी वज्रमूठ सभेत पोलिसांच्या अटींचं पालन न झाल्याचा आरोपही केला.

Published on: Apr 17, 2023 01:48 PM