महाराष्ट्रात विधानसभेतही ‘मविआ’ची सत्ता? लोकसभा निकालानुसार विधानसभेचा EXCLUSIVE कौल काय?
लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल पाहिला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येताना दिसतेय. महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ आहेत. एका लोकसभा मतदारसंघात ०६ विधानसभा मतदारसंघ येतात. म्हणजेच ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ येतात.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडताना दिसली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि मविआने बाजी मारली. दरम्यान, लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल पाहिला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येताना दिसतेय. महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ आहेत. एका लोकसभा मतदारसंघात ०६ विधानसभा मतदारसंघ येतात. म्हणजेच ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ येतात. ४८ लोकसभा मतदारसंघात महायुतीला १७, मविआला ३० तर इतरांमध्ये सांगलीत विशाल पाटील बंडखोर आमदार निवडून आले. यावरून महाविकास आघाडीला १५४ जागांवर आघाडी आहे. तर महायुती १२३ जागांवर पुढे आहे. दरम्यान, यामध्ये बहुमताचा आकडा आहे १४५… म्हणजे मविआ ३१ जागांनी पुढे असून विधानसभेत मविआची सत्ता येणार असल्याचं दिसतंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…