उदयनराजे मिशा, भुवया काय काढतील काढू द्या; शिवेंद्र राजे यांची टोलेबाजी

उदयनराजे मिशा, भुवया काय काढतील काढू द्या; शिवेंद्र राजे यांची टोलेबाजी

| Updated on: Mar 24, 2023 | 2:44 PM

VIDEO | उदयनराजे भोसले इतके पारंगत होते तर मग लोकसभा का हरले? शिवेंद्रराजे भोसले यांनी सवाल उपस्थित करत दिलं आव्हान

मुंबई : ‘आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांनी एकदा लोकांपुढे येऊन खरं कुठे केलं पाहिजे उदयनराजेंनी पैसे खाल्ले असे म्हटलं तर मिशा काय भुवया काढून टाकू आम्ही छत्रपतींचा वारसा पुढे नेत आहोत’ असे आव्हान देऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना खुले आव्हान दिले आहे. यावर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उदयनराजेंना बुद्धीचा भाग नाही, त्यांचा कमिशनचा धंदा आहे. पालिकेत त्यांनी काय दिवे लावले सातारकरांना माहीत आहे, आत्ता ते मिशा काय काढतील भूवया काय काढतील काढू द्या काही फरक पडत नाही’, असे म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर जोरदार निशाणा साधला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, साोटी आणि बुद्धी नाटी अशी भोसलेंची गत झाली आहे. ते इतके पारंगत असते तर लोकसभा का हरले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. माझा विरोध कायम राहील, पुढच्या निवडणुकीत माझी ताकद दाखवेन, असा इशारावजा आव्हानही शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.

Published on: Mar 24, 2023 02:44 PM