रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार

रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम नाही, ‘या’ तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार

| Updated on: May 28, 2024 | 12:31 PM

रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर फारसा परिणाम होणार नाही, मान्सूनसाठी सध्या पोषक स्थिती कायम आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी दिली. तर येत्या तीन ते चार दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यताही नागपूर हवामान विभागाने वर्तविली आहे

रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर फारसा परिणाम होणार नाही, मान्सूनसाठी सध्या पोषक स्थिती कायम आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी दिली. तर येत्या तीन ते चार दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाजही नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी वर्तविला आहे. नागपूर हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये येत्या तीन ते चार दिवसात मान्सून दाखल होणार असल्याने साधारणतः आठवड्याभराने महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन होत असते म्हणजेच ७ जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं आगमन होणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील या मान्सूनपूर्व हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे आणि हिंदी महासागरातील चक्रीवादळांच्या नावाच्या प्रणालीनुसार त्याचे नाव रेमल असे ठेवण्यात आले आहे. उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांच्या नावाच्या प्रणालीनुसार हे नाव ओमानने दिले आहे.

Published on: May 28, 2024 12:30 PM