बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांची धडक मोहीम, एका दिवसांत 220 रिक्षा कुठं केल्या जप्त?

बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांची धडक मोहीम, एका दिवसांत 220 रिक्षा कुठं केल्या जप्त?

| Updated on: Aug 19, 2023 | 5:10 PM

VIDEO | बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, पोलिसांच्या धडक मोहिमेतून एका दिवसांत तब्बल २२० पेक्षा जास्त ॲाटोरिक्षा जप्त, जप्त केलेल्या रिक्षा थेट पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात

नागपूर, १९ ऑगस्ट २०२३ | नागपूर शहरात रिक्षा चालकांवर आता चाप बसणार आहे. कारण नागपुरात बेशिस्त ऑटोरिक्षाचालकांवर पोलिसांची नजर आहे. नागपूरातील बेशिस्त ॲाटोचालकांवर कारवाईची मोहिम नागपूर पोलिसांनी सुरु केली आहे. याच मोहिमेतून एका दिवसांत तब्बल २२० पेक्षा जास्त ॲाटोरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ॲाटो रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसवणे, सिग्नल तोडणे, रॅश ड्रायव्हिंग आणि प्रवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या ॲाटोचालकांवर नागपूर पोलिसांकडूनही कारवाई करण्यात आली आहे. नागपूरात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिम राबवत ही कारवाई केली आहे. जप्त केलेले २२० ऑटोरिक्षा थेट पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Aug 19, 2023 05:10 PM