नागपुरकरांनो सावधान! ग्रीन सिटीमधील वातावरणात होतोय बदल, बघा व्हिडीओ

नागपुरकरांनो सावधान! ग्रीन सिटीमधील वातावरणात होतोय बदल, बघा व्हिडीओ

| Updated on: Mar 08, 2023 | 10:44 AM

VIDEO | नागपूरातील वातावरणातील प्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढला, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी काय सांगते?

गजानन उमाटे, नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून समोर आले आकडेवारी ही नागपूर शहरातील नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरणारी आहे. नागपूरातील हवा प्रदूषणात चांगलीच वाढ झाली आहे. ग्रीन सिटी म्हणून ओळख असलेले नागपूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडलं आहे. नागपूर शहरातील वातावरणात सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायॉक्साईडचा स्तर प्रचंड वाढल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते मार्चमधील ६४ दिवसांपैकी ६० दिवस हवा प्रदूषित असल्याचे निदर्शनात आलं आहे. यामुळे नागपूरात आजाराचे प्रमाणही वाढत आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणात झाडं हिरवळ असली तरी नागपूरातील वातावरणात सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायॉक्साईडचा स्तर प्रचंड वाढल्याने नागपुरकरांची चिंता वाढली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागपुरकरांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, अॅलर्जी यासारखे आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.