विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात महापुराचा धोका, ‘या’ ११ जिल्ह्यांसाठी NDRF ची टीम २४ तास अलर्टवर
VIDEO | नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा, विदर्भातील 'या'११ जिल्ह्यांसाठी NDRF ची टीम 24 तास अलर्टवर
नागपूर, 4 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक हैराण झाले असताना आता पुन्हा एकदा राज्यातील नागपुरसह विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळाधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विदर्भात पुरस्थिती निर्माण झाल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नागपूरात NDRF ची ४७ जणांची टीम सज्ज करण्यात आली आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी ‘NDRF ॲान व्हील’ या संकल्पनेनुसार ही टीम तयार करण्यात आली आहे. नैसर्गिक संकटातून बचाव व्हावा म्हणून आणि मदतीसाठी एक फोन आला की अवघ्या १५ मिनीटांत NDRF ची टीम लोकांचा जीव वाचवण्यासाठी रवाना होते. विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका असतो. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी NDRF ची टीम नागपूरात २४ तास अलर्टवर असणार आहे.

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
