फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांच्या मिश्किल टिप्पणीने खसखस
पुण्यात आज नाम फाऊंडेशनचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यानंतर फडणवीस साहेब बारीक झालेत, नाही का? असं मिश्किल उद्घार नानांनी काढलं. नाना पाटेकर यांनी हे उद्घार काढताच एकच खसखस पिकली.
फडणवीस साहेब बारीक झाले नाही का? देवेंद्र मी मस्करी करत नाही हं. खूप बारीक झालात, असं मिश्किल उद्गार प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले. त्यामुळे एकच खसखस पिकली. आज पुण्यात नाम फाऊंडेशनचा कार्यक्रम होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. फडणवीस स्टेजवर आल्यावर नाना पाटेकर यांनी त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर माईक हातात घेऊन नानांनी ही मिश्किल टिप्पणी केली. तुम्ही आमचा मोठा सन्मान केला. वेगवेगळ्या पद्धतीने सरकार आमचा सन्मान करत असते. अगदी घरं देण्यापासून सर्व काही तुम्ही देता. पण तुम्हाला आम्ही एक विनंती करतो. आमची ही विनंती तुम्ही मोदी साहेबांपर्यंत पोहोचवा. तेवढा स्वामिनाथन आयोग लागू करा. हा आयोग अंशत: लागू आहे. पूर्ण लागू केला तर याच्यापेक्षा आमचा, शेतकऱ्यांचा मोठा सन्मान नसेल, असं नाना पाटेकर म्हणाले.
Published on: Sep 21, 2024 02:23 PM
Latest Videos