Nana Patekar Slaps Fan: सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनवर भडकले नाना पाटेकर, थेट लगावली…, व्हिडीओ होतोय व्हायरल
नाना पाटेकर हे सध्या वाराणसीमध्ये येथे असून त्यांच्या आगामी जर्नी या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक असा प्रकार घडला की त्याची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. एक चाहता नानांसोबत सेल्फी घेण्यासाठी गेला, यावेळी त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याला टपली मारली
वाराणसी, १५ नोव्हेंबर २०२३ | Nana Patekar Viral Video : अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या कणखर वृत्ती आणि स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे ते कधी काय करती याचा नेम नाही. जर्नी इन काशी चित्रपटाचं वाराणसी येथे शितला घाटाजवळ ते शूटिंग करत होते. घाटाच्या वरच्या भागात रस्त्यांचे शॉट्स घेतले जात असताना एक चाहता नानांसोबत सेल्फी घेण्यासाठी गेला, यावेळी नाना पाटेकर यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याला टपली मारल्याचे पाहायला मिळाले. नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नाना पाटेकर यांच्या चाहते, नेटकरी त्यांच्यावर नाराज झाले आहे. तर या व्हिडीओवर नानाचं वागणं योग्य नसल्याची कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?

जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र

अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?

हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
