Video : ‘एरव्ही मी त्यांना इतक्या शिव्या देतो, पण…’ असं म्हणत नाना पाटेकरांनी त्यांना जेवण वाढलं!
Nana Patekar News : फक्त अभिनयच नव्हे, तर आपल्या सामाजिक कार्यासाठी नाना पाटेकर ओळखले जातात.
गायक राहुल देशपांडेनं (Rahul Deshpande) नाना पाटेकर (Nana Patekar News) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर मटणाचं जेवण वाढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणता आहे, हे कळू शकलं नाही. मात्र या व्हिडीओतून पुन्हा एका ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा दिलखुलास अंदाज दिसून आलाय. विटांची एक चूल तयार करुन त्यावर मटण बनवण्यात आलं होतं. नंतर सगळ्यांना नाना पाटेकरांनी हे मटणाचं जेवणं वाढलंय. एरव्ही मी त्यांना इतक्या शिव्या देतो, पण एखादा दिवस असं यांना जेवणं वाढून बरं वाटतं, अशी प्रतिक्रियादेखील देताना नाना पाटेकर या व्हिडीओमध्ये दिसतात. राहुल देशपांडे यांनीच नाना पाटेकर यांना हा प्रश्न विचारलेला होता. फक्त अभिनयच नव्हे, तर आपल्या सामाजिक कार्यासाठी नाना पाटेकर ओळखले जातात. नाम फाऊंडेशनसोबतही त्यांचं काम सुरु असतं. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar Video) यांचा हा रांगडा अंदाज पुन्हा चाहत्यांना भावून गेलाय.