“शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा”, काँग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे.यावेळी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं यासाठी प्रत्येक आमदाराची इच्छा आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या चार ते पाच मंत्र्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याचे समजते.यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे.यावेळी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं यासाठी प्रत्येक आमदाराची इच्छा आहे. अशातच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या चार ते पाच मंत्र्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या पाच मंत्र्यांची मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.यावरून आता राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. “राज्यात कायदा सुव्यस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. हे पाप महाराष्ट्रातलं सरकार करत आहे. त्यामुळे 4,5 मंत्र्यांना काढण्यापेक्षा शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा. राष्ट्रपती राजवट लावावी”, अशी मागणी काँग्रेस करत आहे.
Published on: Jun 12, 2023 04:29 PM
Latest Videos