पंतप्रधान नरेंद्र मोदीच देव आहेत असं भाजपचं वर्तन : नाना पटोले

| Updated on: Mar 06, 2022 | 5:12 PM

भाजपकडून त्याची पुनरावृत्ती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव आहेत, अशा प्रकारचं वर्तन भाजपकडून करण्यात येत आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे दैवत आहेत. आमच्या या दैवतांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत असतात. कर्नाटकातील भाजपा सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत आहे. भाजपाची ही विकृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारी नाही. आजही पुण्यातील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या पगडीवर छत्रपत्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावण्यात आली होती. काँग्रेसने त्याला आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. नरेंद्र मोदी हे आमच्या महापुरुषांपेक्षा मोठे आहेत हे भाजप दाखवण्याचा प्रयत्न करत असते परंतु मोदी हे शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांपेक्षा मोठे नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेने ठणकावून सांगितले आहे तरीही जाणीवपूर्वक भाजपकडून त्याची पुनरावृत्ती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव आहेत, अशा प्रकारचं वर्तन भाजपकडून करण्यात येत आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

Gondia Accident | गोंदिया जिल्ह्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू
दोन पवारांच्या निशाण्यावर राज्यपाल, अजित पवार, शरद पवार आज काय म्हणाले?