‘त्या’ गावगुंडाचा भाजपला इतका पुळका का ? कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
बेटी बचाव आणि बेटी पटावं असं म्हणाऱ्याच पुतळे जाळे पाहिजेत ज्यांनी शेतकऱ्याच्या अंगावर गाड्या घातल्या त्यांच्या विरोधात आंदोलन भाजपने केले पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
गावगुंडाचा पुळका भाजपला का आला आहे. मी सुरुवातीला सांगितलं कि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल बोलो नव्हतो तर गाव गुंडा बद्दल बोलो होतो. ज्यांनी बेटी बचाव आणि बेटी पटावं असं म्हणाऱ्याच पुतळे जाळे पाहिजेत ज्यांनी शेतकऱ्याच्या अंगावर गाड्या घातल्या त्यांच्या विरोधात आंदोलन भाजपने केले पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. भाजप महाराष्ट्राल बदनाम करण्याचं काम करतंय तसेच एक संस्कृती निर्माण करण्याचं काम करत आहे. केंद्र सरकारचं अपशय लपवण्यासाठी एकाद्या गोष्टीचा बाऊ बनवला जात आहे ,आम्ही म्हणतो ते खरं आहे, असं भाजप वागत नाही. भाजपला सत्तेचा गर्व झाला आहे जनता आता यांना त्यांची जागा दाखवेल, असं नाना पटोले म्हणाले.