नांदेड हादरलं! लग्नाच्या वरातीत नाचणं जीवावर बेतलं, दोन गटात हाणामारी, दगड फेक आणि एकाचा मृत्यू
नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार गावात ही घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार हवेली गावात वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली.
नांदेड : नांदेडमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नांदेडमध्ये वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार गावात ही घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार हवेली गावात वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाला आहे. गावात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. बोंडार गावात झालेल्या हाणामारीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावात रात्री झालेल्या दगडफेकीत काही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलय. या प्रकरणी काही जण सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याने हे प्रकरण चिघळण्याची भीती व्यक्त केल्या जातेय.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..

