असं काय घडलं की, नांदेडमध्ये अज्ञात तरूणांनी पेटवली बस अन्…

| Updated on: Sep 13, 2023 | 2:15 PM

VIDEO | राज्यभरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पडसाद उमटत असताना मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मराठा आंदोलक झाला आक्रमक, नांदेडमध्ये रात्री उशीरा कासारखेडा पुलाजवळ अज्ञातांनी बसच पेटवली

नांदेड, १३ सप्टेंबर २०२३ | परभणी जिल्ह्यातील वसमतहून ४७ प्रवासी घेऊन बस नांदेडकडे येत होती. रात्री उशीरा कासारखेडा पुलाजवळ बस आल्यावर २० ते २५ युवकांनी बसवर जोरदार दगडफेक केल्याची घटना घडली. या बसमध्ये प्रवाशी असतानाही अज्ञात तरूणांकडून ही दगडफेक करण्यात आली. तर दगडफेक सुरू झाल्याची घटना घडताच प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत बसमधून खाली उतरले. अज्ञात तरूणांनी दगडफेकच केली नाही तर बसमधून प्रवासी खाली उतरल्यानंतर तरूणांनी एसटी बस पेट्रोल टाकून पेटवली. बस पेटवल्यानंतर या अज्ञात हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेवेळी अज्ञात तरूणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या, अशी माहिती या बसच्या वाहकाकडून देण्यात आली. या घटनेमुळे हा प्रकार घडलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही बस पेटवणारे अज्ञात तरूण कोण आहेत? ते कुठून आले होते? याची माहिती अद्याप समोर आली नाही. तर या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेकडून घेण्यात आलेली नाही.

Published on: Sep 13, 2023 02:15 PM
Ajit Pawar गटाला मोठा झटका, Twitter अकाऊंट सस्पेंड अन्…, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईतील ‘त्या’ प्रकारानंतर अन्न-औषध प्रशासन अॅक्शनमोडमध्ये, ६८ हॉटेल्सना FDA कडून थेट नोटीस