Nanded | नांदेडमध्ये संततधार पावसामुळे शाळेची पडझड, नवीन इमारत देण्याची ग्रामस्थांची मागणी
नांदेडमध्ये संततधार पावसामुळे शाळेची पडझड झालीये. मदखेड तालुक्यातील शाळेची भिंत कोसळली आहे. येत्या 15 जुलैपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे आता पारडी गावात शाळेची नवीन इमारत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीये.
नांदेडमध्ये संततधार पावसामुळे शाळेची पडझड झालीये. मदखेड तालुक्यातील शाळेची भिंत कोसळली आहे. येत्या 15 जुलैपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे आता पारडी गावात शाळेची नवीन इमारत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीये. तर नांदेडच्या हदगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. हदगाव तालुक्यातील वायफना, आष्टी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसाने शेकडो एकर शेतीचे नुकसान झालाय. या पावसाने पिके वाहून गेली असून जमीन खरडून गेलीय. तर हदगाव-हिमायतनगर रस्त्यावरचे पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झालीये .
Latest Videos