Video: नांदेडमध्ये गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद, भाजपचा माजी शहराध्यक्ष टार्गेटवर, नेमकं काय घडलं?
नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्षावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीय. प्रसंगावधान राखत पळ काढल्याने त्याचा जीव बचावला. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीय. नांदेड भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष सोनू कल्याणकरवर हा गोळीबार करण्यात आला.
नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्षावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीय. प्रसंगावधान राखत पळ काढल्याने त्याचा जीव बचावला. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीय. नांदेड भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष सोनू कल्याणकरवर हा गोळीबार करण्यात आला. सोनू कल्याणकर श्रीनगर भागातील आपल्या घराच्या गेटमध्ये बसला होता. रात्री 9 च्या सुमारास दुचाकीवर तिघेजण त्याच्या घरासमोर आले. त्यापैकी दोघांनी सोनू वर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. प्रसंगावधान राखत सोनू घरामध्ये पळाला त्यामुळे त्याचा जीव वाचला. अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 3 गोळ्या झाडल्या. गोळीबाराची ही घटना पूर्व वैमानस्यातून घडली की इतर काही कारणं आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशत पसरलीय.
Latest Videos