नंदुरबारमध्ये दादा-बाबा गणपतीची हरीहर भेट मोठ्या उत्साहात संपन्न
नंदुरबारला दादा-बाबा गणपतीची भेट होते. ऐतिहासिक दादा-बाबा गणपतीची हरीहर भेट मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
नंदुरबार : गणेशभक्तांसाठी आज अतिशय भावनिक दिवस आहे. मागचे 10 दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा केली. त्याच गणपती बाप्पाचं आज विसर्जन केलं जातंय. त्यामुळे गणेशभक्त भावूक झाल्याचंही पाहायला मिळतंय. नंदुरबारमध्येही (Nandurbar) असंच उत्साहाचं वातावरण आहे. नंदुरबारला दादा-बाबा गणपतीची भेट (Dada baba Ganpati) होते. ऐतिहासिक दादा-बाबा गणपतीची हरीहर भेट मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी फुलं आणि गुलालालाची उधळण करण्यात आली.