संजय राऊत सेनेत की राष्ट्रवादीत आहेत? संजय राऊतांना नारायण राणेंचा सवाल
शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
मुंबई: शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ज्यांनी कधी कुणाच्या कानशिलात लगावली नाही, त्यांनी धमकीची भाषा करू नये, असं सांगतानाच स्वत:ला सांभाळा. तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. संजय राऊत हे शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असा सवाल देखील नारायण राणे यांनी केला आहे.
आजची शिवसेना राहिली नाही. आजची शिवसेना बाळासाहेबांचीही नाही आणि जुन्या शिवसैनिकांचीही नाही. ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची शिवसेना आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये, अशी टीकाही त्यांनी केली.
Published on: Jun 19, 2021 05:29 PM
Latest Videos