रमेश मोरे आणि जया जाधवची हत्या का झाली? भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांना सवाल

“रमेश मोरे आणि जया जाधवची हत्या का झाली?” भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांना सवाल

| Updated on: Jun 27, 2023 | 8:06 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाबाबत एक विधान केलं होतं. या विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लबोल केला आहे. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांची जाहीर सभा झाली.

रत्नागिरी: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाबाबत एक विधान केलं होतं. या विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लबोल केला आहे. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांची जाहीर सभा झाली. या सभेत ते म्हणाले की, “मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की, तुम्ही आमच्या देवेंद्रजींच्या परिवाराबद्दल बोलता मग रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या का झाली, हे सांगाल का? हे सांगण्याची नैतिकता तुमच्यात आहे का? हा प्रश्न उद्धव ठाकरेच्या घरातील आहे. उद्धव ठाकरेंच्या घरातील अंतर्गत प्रश्न असल्यामुळे आमचा सोबती रमेश मोरे आणि जया जाधव गेले. हा माणूस खोक्यांवर बोलतो. पण आहो उद्धवजी, आम्ही खोके दिले नसते तर मातोश्रीची पहिली इमारतही उभारली नसती. दुसऱ्या इमारतीचा तर प्रश्नच सोडा.”

Published on: Jun 27, 2023 08:06 AM