Nashik : वणीच्या सप्तश्रृंगी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? बघा भाविकांची ढकलाढकली, नेमकं काय घडलं?
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ तसेच खानदेशची कुलस्वामिनी म्हणून नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी मातेची ओळख आहे. सध्या या गडावर चैत्र नवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
श्री सप्तशृंगी गडावर चैत्र नवरात्रीचा उत्सव जल्लोषात सुरू आहे. चैत्र नवरात्री उत्सवानिमित्ताने सप्तशृंगी मातेचे मंदीर उत्सव काळात भाविकांसाठी 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय मंदीर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. असे असतानाही सप्तशृंगी गडावर भाविकांची तुफान गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे. दहा लाख भाविक यात्रेसाठी गडावर येण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला होता. त्याप्रमाणेच भाविकांनी अलोट गर्दी चैत्र पौर्णिमा यात्रा निमित्त गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी झाली आहे. सध्या एक व्हिडीओ समोर आला असून सप्तशृंगी गडावर भाविकांचा जनसागर लोटला असल्याचे त्यात पाहायला मिळत आहे. सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी केवळ नाशिक जिल्ह्यातीलच भाविक नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील भाविक देखील या यात्रेसाठी गडावर येत असतात. मात्र भाविकांची अचानक अलोट गर्दी झाल्याने दर्शनासाठी आलेल्यांमध्ये ढकलाढकली झाल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
