अजित पवार यांच्या निर्णयाने सांगलीत खळबळ; आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा निर्णय काय?
राष्ट्रवादीतच आता दोन गट तयार झाले आहेत. यावरून सांगलीतही माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर.पाटील यांच्या मतदार संघासह जिल्ह्यातही परिणाम दिसू लागले आहेत.
कराड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप, शिंदे गटाशी हातमिळवणी केली. तसेच थेट सत्तेत प्रवेश करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीतच आता दोन गट तयार झाले आहेत. यावरून सांगलीतही माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर.पाटील यांच्या मतदार संघासह जिल्ह्यातही परिणाम दिसू लागले आहेत. मात्र याचम मुद्द्यावरून स्वर्गीय आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी सर्वसामान्यांची नाळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे जे आमदार किंवा अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून गेले तरी त्याचा काहीकाही फरक पक्षावर पडणार नसल्याचं स्पष्ट मत रोहित पाटील यांनी मांडलं आहे. ते कराड येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी बोलत होते. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे समाधीस्थळी आले असताना त्यांची भेट घेण्यासाठी रोहित पाटील हे तेथे गेले होते.