जागा वाटपाचा फार्म्युलाच काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य नाही, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणाला, त्यामुळेच...

जागा वाटपाचा फार्म्युलाच काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य नाही, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणाला, त्यामुळेच…

| Updated on: May 18, 2023 | 8:47 AM

लोकसभा निवडणूक आणि विधानसभेवर जागा वाटपावरून चर्चा झाली. तर आगामी निवडणूक आघाडी म्हणूनच लढण्याचे ठरले. मात्र याच दरम्यान मविआतील वाद समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी थेट आपल्याच मित्र पक्षांवर आरोप केले.

मुंबई : काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिलव्हर ओकवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यात लोकसभा निवडणूक आणि विधानसभेवर जागा वाटपावरून चर्चा झाली. तर आगामी निवडणूक आघाडी म्हणूनच लढण्याचे ठरले. मात्र याच दरम्यान मविआतील वाद समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी थेट आपल्याच मित्र पक्षांवर आरोप केले. मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चर्चेपेक्षा वेगळे मुद्दे सांगतात असे ते म्हणाले. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मविआवर टीका केली आहे. त्यांनी मविआत काहीच अलबेल नाही. तर राष्ट्रवादीला ठाकरे गटाची किती ताकद आहे हे कळाल्यानेच ते त्यांची भूमिका मांडत आहेत असं म्हटलं आहे. तर समान जागा वाटपाचा फार्म्युला हा काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य नसल्याचा गौपस्फोट देखील त्यांनी केला आहे. त्यामुळेच ही आघाडी टिकणार की नाही असा संभ्रम निर्माण झाल्याचं ते म्हणाले.

Published on: May 18, 2023 08:47 AM