Navi Mumbai | नवी मुंबई मनपाकडे मालमत्ता कराच्या कोट्यवधींची थकबाकी, 26 जणांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
मालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. 5 कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या 26 जणांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे बजावण्यात आले आहेत.
मालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. 5 कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या 26 जणांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे बजावण्यात आले आहेत. नोटीस बजावल्यापासून 21 दिवसांच्या आत रक्कम जमा न झाल्यास सदर मालमत्ता लिलावात विक्री केली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. मालमत्ता कर हे पालिकेच्या प्रमुख उत्पन्ना स्त्रोतपैकी एक स्त्रोत आहे. त्याचीच वसुली होत नसून पालिकेच्या विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करूनही आणि त्याला मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न देणार्या थकबाकीदार मालमत्ताधारकांना जाणीव व्हावी याकरता नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.