संभाजीराजे छत्रपती यांची आज नवी मुंबईत सभा; स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती आज नवी मुंबईत येत आहेत. त्यांची आज संध्याकाळी सभा असणार आहे. त्यांच्या स्वागताचे बॅनर नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पाहा...
मुंबई : ‘स्वराज्य’प्रमुख संभाजीराजे छत्रपती आज नवी मुंबईत येत आहेत. आज संध्याकाळी सात वाजता त्यांची नवी मुंबईमधील कोपरखैरणेत सभा होतेय. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वागताचे नवी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. स्वराज्य नवी मुंबई संघटनेकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. ‘रयतेचे राज्य नवी मुंबई स्वराज्य’ असा देखील या बॅनरवर लिहिण्यात आलंय. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचं आगमन होणार आहे. त्यानंतर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. वाशी ते कोपरखैरणे रॅली असणार आहे. या रॅलीनंतर त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची कोपरखैरण्यामध्ये सभा असणार आहे. या सभेमध्ये ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
