Republic Day : राणा दाम्पत्यानं CRPF जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन
ध्वजारोहण झाल्यानंतर नवनीत राणा यांनी सुरक्षा रक्षकांना जिलेबी, मिठाई वाटून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात
आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करत राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच आमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील गंगा सावित्री निवासस्थानी झेंडावंदन केले आहे. यावेळी राणा दाम्पत्यांनी ध्वाजाला सलामी दिली.
राणा दाम्पत्यांनी यंदाचा प्रजासत्ताक दिन सीआरपीएफ जवानासोबत अमरावतीत साजरा केला. ध्वजारोहण झाल्यानंतर नवनीत राणा यांनी सुरक्षा रक्षकांना जिलेबी, मिठाई वाटून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. ध्वजारोहण झाल्यानंतर नवनीत राणांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गर्व आहे भारतीय असल्याची भावना व्यक्त केली. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नवनीत राणा यांनी कौतुक केले आणि मरेपर्यंत देशासाठी काम करणार असल्याचेही सांगितले.