नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर सुटका होताच नवाब मलिक हे नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूर विधानभवनात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार
नागपूर, ७ डिसेंबर २०२३ : राज्य विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहेत. नागपूर विधानभवनात या अधिवेशनापूर्वी सर्वच राजकीय नेते दाखल होताना दिसताय. अशातच मनी लाँड्रिंग प्रकरणी गेले कित्येक दिवस राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे तुरूंगात होते. मात्र नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर सुटका होताच नवाब मलिक हे नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूर विधानभवनात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होताना पाहायला मिळणार आहे. मात्र कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार नवाब मलिक हे माध्यमांशी संवाद साधू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनात जरी सहभागी होताना दिसत असले तरी मलिक आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला की शरद पवार गटाला नेमकं कोणाला पाठिंबा देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.