आकड्यांचा धंदा भाजपचा आहे, किरीट सोमय्यांना कळलं पाहिजे : नवाब मलिक

| Updated on: Jan 20, 2022 | 11:25 AM

आकड्यांचा खेळ भाजप करतंय, अमित शाह अब की बार ३०० पार म्हणतात, तर ते आकडे फेकतात आम्ही नाही… आकड्यांचा धंदा भाजपचा आहे , सोमय्यांना हे कळलं पाहीजे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत एक नंबर असल्याचं समोर आलं आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये दबाव आणल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे करत आहेत. फडणवीस आणि पाटील यांचे आरोप हा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभं करत आहे. साम दाम दंड भेद ही भाषा देवेंद्र फडणवीस करत होते. भाजपला लोक नाकारत आहेत हा संदेश आल्यानंतर काही तरी बोलयाला हवं म्हणून ते बोलत आहेत, असं नवाब मलिक म्हणाले. आगामी काळात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढतील, काही ठिकाणी शिवसेना आमच्या सोबत असेल तर काही ठिकाणी स्वबळावर लढू, असं नवाब मलिक म्हणाले. आकड्यांचा खेळ भाजप करतंय, अमित शाह अब की बार ३०० पार म्हणतात, तर ते आकडे फेकतात आम्ही नाही… आकड्यांचा धंदा भाजपचा आहे , सोमय्यांना हे कळलं पाहीजे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

KDCC Bank Chairman : कोल्हापूर जिल्हा बँकेची धुरा कुणाकडं? हसन मुश्रीफ की पी.एन.पाटील
Nawab Malik यांना मला एक गिफ्ट द्यायचंय, आम्ही त्यांना सोडणार नाही : किरीट सोमय्या यांचं वक्तव्य