नवाब मलिक बिन खात्याचे मंत्री राहणार, पालकमंत्रीपदाची जबाबदारीही दुसऱ्याकडे!
नवाब मलिकांच्या राजीनामा घेवू नये अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे देण्यात येणार आहे.तसेच नवाब मलिक यांच्याकडे जी पालकमंत्रीपद आहेत तीही काढून घेण्यात येणार आहे. नवाब मलिक सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याबाबत आता एक मोठा निर्णय समोर आला आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे. ही बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात नवाब मलिकांच्या राजीनामा घेवू नये अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे देण्यात येणार आहे.तसेच नवाब मलिक यांच्याकडे जी पालकमंत्रीपद आहेत तीही काढून घेण्यात येणार आहे. नवाब मलिक सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
